Nag Panchamee : नागपंचमीनिमित्त सफाई कामगार महिलांच्या हातावर विद्यार्थ्यांनी रंगवला मेंहदीचा रंग

एमपीसी न्यूज – खिंवसरा विद्यालयाच्या विद्यार्थीनींनी सफाई कामगार महिलांच्या हातावर मेहंदी काढत कामगार महिलांच्या मनातही आनंदाचे रंग भरले आहेत. हा उपक्रम सोमवारी (दि.1) खिंवसरा विद्यालयात करण्यात आला.

या उपक्रमात शाळेचे मुख्याध्यापक नटराज जगताप, सहशिक्षिका माधुरी कुलकर्णी, वीणा तांबे, मीना जाधव, सीमा आखाडे, गणेश शिंदे, संदिप बरकडे, कृतिका कोराम, प्रांजली पाटील, होनशेट्टे, स्मिता जोशी यांनी सहभाग घेतला. या मेहंदी स्पर्धेचे परीक्षण सहशिक्षिका प्रांजली पाटील यांनी केले.

 

श्रावण महिन्यातील सणांचा आनंद कष्टकरी, सफाई कामगार महिलांनासुद्धा घेता यावा म्हणून खिंवसरा पाटील शिक्षण संकुलातील विद्यार्थिंनींनी महापालिकेच्या गणेशनगर विभागातील सर्व सफाई कामगार व कष्टकरी महिलांच्या हातावर मेहंदी काढून त्यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त केली.सतत कष्ट करणार्‍या, परिसराची स्वच्छता करणार्‍या हातावर  मेहंदीचा रंग चढल्यावर त्यांनी शालेय विद्यार्थिंनींना मनापासून प्रेमाने आशीर्वाद दिले. तसेच शाळेने हा अनोखा उपक्रम घेवून एक सामाजिक घटक म्हणून आमचीही दखल घेतली याचा आनंद या कष्टकरी महिलांनी व्यक्त केला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.