Nigdi Molestation Case : विनयभंग केल्याप्रकरणी एकावर गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज – दृष्ट हेतूने विनयभंग (Nigdi Molestation Case) केल्याप्रकरणी एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. निगडी पोलिसांकडून याप्रकरणी आणखी तपास करण्यात येत आहे. 

रविराज ताकवणे असे आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी एका व्यक्तीने निगडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मुंबई हायकोर्टात चालू खटल्यामध्ये ताकवणे यांनी फिर्यादीला त्यांच्या विरूद्ध खटल्यात साक्ष देण्यापासून परावृत्त करण्यासाठी फिर्यादी यांच्या पत्नी आणि आईला अत्यंत अश्लील व गलिच्छ भाषेत अपमानस्पद शब्द वापरून मेसेजस पाठवून विनयभंग (Nigdi Molestation Case) केला.

PCMC News : कार्यालयीन वेळेत ‘टाईमपास’ करणा-या महापालिका कर्मचा-यांवर आता राहणार ‘वॉच’!

 

Maharashtra Corona Update : राज्यात सोमवारी 2354 नव्या रुग्णांची नोंद तर 1485 रुग्ण कोरोनामुक्त

फिर्यादी यांच्या घरी जाऊन ताकवणे यांनी अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करून त्यांना जीवे मारण्याची धमकी सुद्धा दिली. याप्रकरणी निगडी पोलिसांनी रविराज ताकवणे यांच्याविरोधात भा. द. वि कलम 354, 354(अ), 195(अ), 504, 506 सह कलम 67, 67(अ ) माहिती तंत्रज्ञान कायदा 2000 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून आणखी तपास करण्यात येत आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.