Hinjawadi : उघड्या दरवाजावाटे चोरी; 75 हजारांचा ऐवज लंपास

एमपीसी न्यूज – बाल्कनीच्या उघड्या दरवाजावाटे चोरट्याने घरातून 75 हजार रुपये किमतीचे सोन्या-चांदीचे दागिने चोरून नेले. ही घटना रॉयलसेरेन सोसायटी, म्हाळुंगे येथे घडली.

सुधीरकुमार केव्हीबालचंद्रन कुय्यनूर (वय 37, रा. रॉयलसेरेन सोसायटी, म्हाळुंगे) यांनी याप्रकरणी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, अज्ञात चोरट्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 10 ऑक्टोबरला सकाळी साडेनऊच्या सुमारास सुधीरकुमार यांच्या घराच्या बाल्कनीचा दरवाजा उघडा होता. त्या दरवाजावाटे येऊन अज्ञात चोरट्याने घरात चोरी केली. घरातील 75 हजार रुपये किमतीचे सोन्या-चांदीचे दागिने चोरून नेले. याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला असून हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.