India Corona Update : देशातील 93.51 लाख रुग्णांपैकी 87.59 झाले कोरोनामुक्त 

एमपीसी न्यूज – मागील चोवीस तासांत देशभरात 41 हजार 322 नव्या कोरोना रुग्णांची वाढ झाली आहे. यासह देशातील एकूण कोरोना बाधित रुग्णांची संख्या 93 लाख 51 हजार 110 एवढी झाली आहे. दिलासादायक बाब म्हणजे एकूण रुग्णांपैकी 87 लाख 59 हजार 969 रुग्ण उपचारानंतर बरे झाले आहेत.

 

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, गेल्या 24 तासांत देशभरात 41 हजार 452 बरे झालेल्या रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. देशाचा रिकव्हरी रेट म्हणजेच रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 93.67 टक्के एवढं झाले आहे. देशात सध्या 4 लाख 54 हजार 940 सक्रिय कोरोना रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

 

 

गेल्या 24 तासांत 485 रुग्णांचा मृत्यू झाला असून आतापर्यंत देशात 1 लाख 36 हजार 200 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यूमुखी पडले आहेत. देशाचा कोरोना मृत्यूदर 1.45 टक्के एवढा आहे. देशात आतापर्यंत 13 कोटी 82 लाख 20 हजार 354 नमुने तपासण्यात आले आहेत. शुक्रवारी (दि.27) 11 लाख 57 हजार 605 नमूणे तपासण्यात आले आहेत. आयसीएआरने याबाबत आकडेवारी जाहीर केली आहे.

 

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज देशातील विविध कोरोना लस विकास आणि उत्पादन प्रक्रियेचा आढावा घेण्यासाठी विविध केंद्रांना भेट देणार आहेत. सकाळी अहमदाबादजवळील झायडस कॅडिलाच्या केंद्रापासून त्यांनी सुरुवात केली. तेथून ते पुण्याच्या सिरम इन्स्टिट्यूट येथे जातील. सिरमने अ‍ॅस्ट्रॅझेनेका आणि ऑक्सफोर्ड विद्यापीठाशी लसीसाठी भागीदारी केली आहे. त्यांचा पुढचा थांबा हैदराबाद येथील भारत बायोटेक असेल.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.