Pune News : कोंढव्यातील संतापजनक घटना, 10 वर्षीय बालिकेवर 70 वर्षीय व्यक्तीकडून लैंगिक अत्याचार

एमपीसी न्यूज : कोंढवा परिसरातून एका संतापजनक घटना उघडकीस आली आहे. पैसे देण्याच्या बहाण्याने 70 वर्षीय व्यक्तीने 10 वर्षीय मुलीवर वारंवार लैंगिक अत्याचार केले. मुलीच्या आईने हा संपूर्ण प्रकार पाहिल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. कोंढवा पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीला अटक करण्यात आली आहे. पीडित मुलीच्या आईने याप्रकरणी तक्रार दिली आहे. 

याप्रकरणी अधिक माहिती अशी की, एकाच परिसरात राहत असल्यामुळे आरोपीची आणि पीडित मुलीच्या आईची तोंडओळख होते. याच ओळखीचा फायदा घेऊन आरोपीने हे घृणास्पद कृत्य केले. पीडित मुलीचे आई-वडील घरी नसताना तो या मुलीला पैसे देऊन तिच्यावर बलात्कार करायचा. मागील दोन महिन्यांपासून त्याचे हे कृत्य सुरू होते. सोमवारी देखील त्याचे हे घृणास्पद कृत्य सुरू असताना पीडित मुलीची आई अचानक घरी आली आणि तिने हा संपूर्ण प्रकार पाहिला.

त्यानंतर तिने तातडीने कोंढवा पोलीस स्टेशन गाठत आरोपी विरोधात तक्रार दिली. पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल करता आरोपीला तत्काळ अटक केली आहे. कोंढवा पोलीस अधिक तपास करत आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.