PCH Lions : पीसीएच लायन्स, साई स्पोर्टस, मॅथ्यू एफए, एएफए सॅनफोर्ड बाद फेरीत

एमपीसी न्यूज – पीसीएच लायन्स (PCH Lions), साई स्पोर्टस, मॅथ्यू एफए, एएफए सॅनफोर्ड यांनी पीडीएफए फुटबॉल लीगच्या नव्या मोसमात बाद फेरीत प्रवेश केला.

सप महाविद्यालयाच्या मैदानावर जालेल्या सामन्यात पीसीएच लायन्स एफसी संघाने रेयाल पुणे युनायटेड ‘ब’ संघाविरुद्ध 1-1 अशी बरोबरी पत्करली. कुणाल येवले याने 49 व्या मिनिटाला पीसीएच लायन्सला बरोबरी साधून दिली. त्यापूर्वी एच गटातील या सामन्यात अविनाण पांडव याने 37 व्या मिनिटाला रेयाल पुणे संघाला आघाडीवर नेले होते.

एच गटातील सामन्यात साई स्पोर्टसने मोमिनपुरा संघाचा 7-0, तर मॅथ्यू एफए संघाने खडकीयन्सचा 2-1 असा पराभव करून चमकदार विजयासह बाद फेरीत प्रवेश केला.

साई स्पोर्टससाठी ओजस देशुपांडे याने 11, 17 आणि 27 व्या मिनिटाला गोल करून हॅटट्रिक नोंदवली. प्रणव काळे याने 7व्या, वेदांत बिजवे याने 36 व्या, सतिश भोईटेने 43 आणि 53 व्या मिनिटाला गोल करून संघाच्या मोठ्या विजयात आपला वाटा उचलला.

मॅथ्यू एफए संघाने राणाप्रताप देशमुखच्या अखेरच्या क्षणातील गोलने खडकीयन्सचा 2-1 असा पराभव केला. त्यापूर्वी दत्विक कारिया याने 12 व्या मिनिटाला त्यांचे खाते उघडले होते. त्यानंतर 32 व्या मिनिटाला एंगा के याने खडकीयन्सला बरोबरी साधून दिली.

River Development Project: काय आहे पुण्यातील नदीकाठ सुधार प्रकल्प?

लीगमधील एफ गटातून सॅमफोर्डने परशुरामियन्स सी संघाचे आव्हान 4-0 असे सहज परतवून लावले. अमन माधुरी याने 23 व्या मिनिटाला पहिला गोल केला. त्याच्यानंतर नेल्सन पास्ते याने 26 आणि 50व्या मिनिटाला दोन, तर एल्विन फ्रान्सिस याने 49व्या मिनिटाला एक गोल केला.

एसएसपीएमस (PCH Lions) मैदानावर सी गटात झालेल्या सामन्यात पुणेरी वॉरियर्सने निलिशा संकेत हिच्या दोन गोलच्या जोरावर स्टेपओव्हर एफए संघाचा 2-0 असा पराभव केला. अ गटात अॅस्पायर एफसीने सिंग लॅम हुआई हिच्या दोन गोलच्या जोरावर उत्कर्ष क्रीडा मंच ब संघाचा 2-0 असा पराभव केला.

निकाल –

एसएसपीएमएस – महिला लिग

सी गट – पुणेरी वॉरियर्स 2 (निलिशा संकेत 16, 60वे मिनिट)वि.वि. स्टेपओव्हर एफए 0
सी गट – स्निग्मय एफसी पुढे चाल वि. क्रीडा प्रबोधिनी
अ गट – अॅस्पायर एफसी 2 (सिंग लॅम हुआई 4, 56 वे मिनिट) वि.वि. उत्कर्ष क्रीडा मंच ब 0

एसएसपीएमएस मैदान – द्वितीय श्रेणी (रेलिगेशन प्ले ऑफ)
वानवडी एफसी 1 (तन्मय शिंदे 8वे मिनिट) बरेबरी वि. एनडीए युथ स्पोर्टस क्लब 1 (दिपक रावत 51वे मिनिट)

सप महाविद्यालय मैदान – तृतिय श्रेणी

एच गट – पीसीएच लायन्स 1(कुणाल येवले 49वे मिनिट) बरोबरी वि. रेयाल पुणे युनायटेड बी 1 (अविनाश पांडव 37वे मिनिट)
ब गट – साई स्पोर्टस 7 (प्रणव काळे 7वे, वेदांत बिजवे 36वे, ओजस देशपांडे 11, 17, 27वे मिनिट, सतिश भोईटे 43, 53वे मिनिट) वि.वलि. मोमिनपुरा एफसी 0
ब गट – मॅथ्यू एफए 2 (दत्विक करिया 12, राणाप्रताप देशमुख 57वे मिनिट) वि.वि. खडकीयन्स 1 (एंगा के. 32वे मिनिट)
एफ गट – एएफए सॅमफोर्ड 4 (अमन माधुरी 23वे, नेल्सन पास्ते 26, 50वे मिनिट, एल्विन फ्रान्सिस 49वे मिनिट) वि.वि. परशुरामियन्स सी 0

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.