PCMC news : … तर महापालिका थकबाकीदार निवासी मालमत्तांधारकांची कार, टीव्ही  जप्त करणार

एमपीसी न्यूज –  पिंपरी-चिंचवड शहरातील मिळकत कर थकबाकी असलेल्या मिळकतधारकांवर जप्तीची आणि वसुलीची जोरदार मोहिम सुरू केली आहे. शहरातील तीन लाख निवासी मालमत्तांधारकांकडे तब्बल 583 कोटी रूपयांचा थकीत कर आहे. (PCMC news) हा कर वसूल करण्यासाठी महापालिकेचे जोरदार प्रयत्न सुरू आहेत. ज्या निवासी मालमत्ता बंद आहे त्या सील करण्याचे कामकाज सध्या सुरू केले आहे. मात्र, ज्या निवासी मालमत्तांमध्ये नागरिक वास्तव्य करतात, अशा थकबाकीदारांकडे 5 किंवा 10 वर्षांपासून थकबाकी आहे. अशा निवासी मालमत्तांची जंगम मालमत्ता म्हणजे कार, टीव्ही आदी महत्वाची वस्तू जप्त करण्याची धडक कारवाई महापालिकेमार्फत याच आठवड्यात करण्यात येणार आहे.

त्यामुळे मिळकतधारकांनी थकीत कर आणि चालू कर भरून महापालिकेला सहकार्य करावे, असे आवाहन महापालिकेच्या कर आकारणी व कर संकलन विभागाचे सहायक आयुक्त निलेश देशमुख यांनी केले आहे. पिंपरी-चिंचवड शहरात 5 लाख 82 हजार मिळकतींची नोंद आहे. चालू आर्थिक वर्षांत आत्तापर्यंत 420 कोटी रूपये कराचा भरणा केला आहे.

महापालिकेच्या 17 विभागीय कार्यालयामार्फत कर संकलानांचे कामकाज केले जाते. गतवर्षी कर संकलन विभागाने 625 कोटी कर वसूल केला होता. यंदा मात्र, कर आकारणी व कर संकलन विभागाचे सहाय्यक आयुक्त निलेश देशमुख यांनी 1 हजार कोटी रूपयांचे टार्गेट पूर्ण करण्यासाठी कंबर कसली आहे. त्यादृष्टीने कर संकलन विभाग सातत्याने नव-नवीन योजना राबवत आहेत.

Shri Dolasnath Maharaj Temple : दीपोत्सवात उजळले श्री डोळसनाथ महाराज मंदिर

शहरातील जास्तीत-जास्त मिळकती कर कक्षेत येण्यासाठी कर संकलन विभागाच्या वतीने माझी मिळकत माझी आकारणी  योजना सुरू केली आहे.(PCMC News) या योजनेमध्ये मोठ्या प्रमाणात मिळकती कर कक्षेत आल्या आहेत. तसेच जनसंवादच्या धर्तीवर महिन्याच्या शेवटच्या शनिवारी करसंवादचेही आयोजन करण्यात येत आहे.

शहरातील 50 हजारांपुढे थकबाकी असणाऱ्या 26 हजार 760, पाच लाखांपेक्षा अधिक थकबाकी असलेल्या व्यावसायिक 1 हजार 361 तर मालमत्ता कराचा एकदाही भरणा न केलेल्या 3 हजार 850 अशा 31 हजार 971 मिळकत धारकांना यापूर्वीच जप्तीच्या नोटीसा कर आकारणी व कर संकलन विभागाने पाठविल्या आहेत. 1 लाखांच्यावर थकीत असलेल्या मालमत्तांची संख्या 8 हजार 791 आहे. (PCMC News) त्यापैकी 691 मालमत्तांना जप्ती अधिपत्रे पाठविली आहेत. अधिपत्र मिळताच 483 नागरिकांनी कर भरला आहे. सील केलेल्या मालमत्तांची संख्या 200 आहे. कर न भरल्यास उर्वरित मालमत्ताही जप्त करण्याचे महापालिकेचे उदिष्ट आहे. या मालमत्ता धारकांनी त्वरीत कर न भरल्यास जप्तीची कारवाई अटळ आहे. त्यामुळे त्यांनी त्वरीत थकीत कर भरून महापालिकेला सहकार्य करावे.

तीन लाख निवासी मालमत्तांधारकांकडे तब्बल 583 कोटी रूपयांचा थकीत कर आहे. महापालिका ज्या निवासी मालमत्ता बंद आहे त्या सील करण्याचे धोरण आखले आहे.(PCMC News) याची कार्यवाही याच आठवड्यात सुरू करण्यात येणार आहे. मात्र, ज्या निवासी मालमत्तांमध्ये नागरिक वास्तव्य करतात, अशा थकबाकीदारांकडे 5 किंवा 10 वर्षांपेक्षा अधिक कालावधीत थकबाकी आहे. अशा निवासी मालमत्तांची जंगम मालमत्ता म्हणजे कार, टीव्ही जप्त करण्याची धडक कारवाई महापालिकेमार्फत करण्यात येणार आहे.

कर भरण्यासाठी महापालिका पाठवतेय लिंक!

नागरिकांना घरबसल्या जास्तीत-जास्त सुविधा देण्याचा महापालिकेच्या कर आकारणी व कर संकलन विभागाचा प्रयत्न आहे. त्यादृष्टीने आत्तापर्यंत मिळकत हस्तांतर, ना हरकत दाखला या महत्वाच्या सुविधांसह कर भरणे वगळता सर्वच सेवा ऑनलाइन उपलब्ध करून दिल्या आहेत. त्याचबरोबर आता नागरिकांना मोबाईलवर कुठेही असताना कर भरण्यासाठी कस्टमाईज पेमेंट लिंक पाठवित आहे.(PCMC News) ज्यांचे नोंदणीकृत मोबाईल आहेत, अशा नागरिकांच्या मोबाईलवर लिंक पाठविण्यात येत आहेत. त्या लिंकवर क्‍लिक केले की नागरिकांचे बील उघडते. त्यानंतर नागरिक कर भरू शकतात. तसेच कर आकारणी व कर संकलन विभागाच्या सर्वच सुविधा ऑनलाइन झाल्यामुळे नागरिकांनी मिळकत कराच्या बिलाशी मोबाईल क्रमांक आणिण ई-मेल आयडी जोडावा आणि सर्व सेवांचा घरबसल्या लाभ घ्या, असे आवाहनही सहायक आयुक्त निलेश देशमुख यांनी केले आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.