Nigdi Robbery Case : अज्ञात व्यक्तीने हिसकावला पादचाऱ्याचा फोन

एमपीसी न्यूज – आकुर्डी येथे 22 जून रोजी एका पादचाऱ्याचा फोन दोन अज्ञात इसमांनी चोरून (Nigdi Robbery Case) नेला आहे. याबाबत पीडित महिलेने फिर्याद दिली आहे.
याप्रकरणी दोन अज्ञात इसमानविरोधात निगडी पोलिस स्टेशन मध्ये भा. द. वि. कलम 392 अंतर्गत दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी 22 जून रोजी रात्री 9.05 च्या सुमारास आरंभ हॉटेल जवळ दत्तवाडी आकुर्डी या ठिकाणी पायी फोनवर बोलत घरी जात असताना पत्ता विचारण्याच्या बहाण्याने अॅक्टिवा वरील चालकाने फिर्यादीचा 14,000 रुपये किंमतीचा रियल मी कंपनीचा मोबाईल जबरदस्तीने चोरून (Nigdi Robbery Case) नेला.
आकुर्डी पोलिस आणखी तपास करीत आहेत.