Pimpri News : मोकळ्या प्लॉट, भूखंडावर कचरा टाकल्यास दंडात्मक कारवाई

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहरातील कोणत्याही मोकळ्या प्लॉट, भूखंडावर कचरा टाकणा-यावर दंडात्मक कारवाई केली जाणार आहे. छोट्या स्वरुपात कचरा टाकणा-या व्यक्ती, आस्थापनेविरुद्ध 5 हजार तर मोठ्या प्रमाणात कचरा टाकल्यास 5 ते 25 हजार रुपयांपर्यंत दंड आकारण्यात येणार आहे.

महापालिकेमार्फेत शहरामध्ये स्वच्छता राखण्याकरिता विविध उपाययोजना करण्यात येते तसेच अस्वच्छता पसरविणा-या व्यक्ती, आस्थापनांविरुद्ध दंडात्मक कारवाई देखील करण्यात येत आहे. परंतु, शहरामध्ये विविध भागांमध्ये मोकळे प्लॉट्स असून त्याठिकाणी कचरा टाकण्यात येत असल्याचे वारंवार निदर्शनास आले आहे. त्यामुळे अशा मोकळ्या प्लॉट्समध्ये कचरा टाकणा-या अथवा कचरा टाकण्यास कारणीभूत ठरणा-या व्यक्ती, आस्थापनांविरुद्ध देखील दंडात्मक कारवाई करणे आवश्यक आहे.

शहरातील सर्व मोकळ्या प्लॉट्स, भूखंडामध्ये असलेली अस्वच्छता सर्व भूखंड धारकांनी तातडीने स्वच्छ करुन घेण्याची कार्यवाही करावी. यापुढे कोणत्याही मोकळ्या प्लॉट्स, भूखंडामध्ये कचरा टाकताना व्यक्ती आढळून आल्यास त्या व्यक्ती विरुद्ध दंडात्मक कारवाई करण्यात येईल.

छोट्या स्वरुपात कचरा टाकणा-या व्यक्ती, आस्थापनेविरुद्ध 5 हजार तर मोठ्या प्रमाणात कचरा टाकल्यास 5 ते 25 हजार रुपयांपर्यंत दंड आकारण्यात येणार आहे. त्याचबरोबर मोकळ्या भूखंडामध्ये अस्वच्छता होऊ नये याची सर्वस्वी जबाबदारी ही त्या जागेच्या मालकाची असल्याने मोकळ्या प्लॉटमध्ये अस्वच्छा झाल्याचे दिसून आल्यास संबंधित मालकावर सुद्धा दंडात्मक कारवाई करण्याचा इशारा आयुक्त राजेश पाटील यांनी दिला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.