Bhosari News : हातगाडी लावल्याच्या किरकोळ कारणावरून एकास बेदम मारहाण

एमपीसी न्यूज : हातगाडी लावल्याच्या कारणावरून (Bhosari News) तिघांनी मिळून एका व्यक्तीस बेदम मारहाण केली. ही घटना बुधवारी (दि. 8) सायंकाळी पावणे आठ वाजता आंबेडकर चौक, खंडे वस्ती, एमआयडीसी भोसरी येथे घडली.

नितीन मोहन वाघमारे (वय 35, रा. एमआयडीसी भोसरी) यांनी याप्रकरणी एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार दत्त भास्कर सोनवणे (वय 20), भास्कर मसाजी सोनवणे (वय 48), शरद कांबळे (वय 48, तिघे रा. एमआयडीसी भोसरी) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Chakan News : चाकण मार्केट यार्डातील बिअर बारमध्ये राडा

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांनी खंडे वस्ती येथे आंबेडकर चौकात संस्कृती स्नॅक्स सेंटर नावाने हातगाडी लावली. यावरून दत्ता याने फिर्यादीस शिवीगाळ केली.(Bhosari News) तू इथे गाडा का लावला, असे म्हटले. भास्कर आणि शरद या दोघांनी फिर्यादीस मारहाण केली. चहाच्या थर्मासने डोळ्यावर मारून त्यांना जखमी केले असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. एमआयडीसी भोसरी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.