Pimpri : पिंपरी न्यायलायात आणखी चार न्यायाधिशांची नियुक्ती; पिंपरी चिंचवड ॲडव्होकेट्स बार असोसिएशनच्या पाठपुराव्याला यश

एमपीसी न्यूज – पिंपरी न्यायालयात आणखी चार कोर्टचे कामकाज सुरू(Pimpri) होण्याचा मार्ग अखेर मोकळा झाला आहे. पुणे येथून चार न्यायाधीशांची पिंपरी न्यायालयात नियुक्ती करण्यात आली आहे. आतापर्यंत पिंपरी न्यायालयातून पाच न्यायाधिशांमार्फत संपूर्ण कामकाज पाहिले जात होते. नव्याने चार कोर्ट सुरू होणार असल्याने कामाचा व्याप काही प्रमाणात कमी होऊन पक्षकारांच्या सुनावण्या लवकर होतील.

नव्याने नेहरूनगर येथे स्थलांतरित झालेल्या कोर्ट इमारतीत एकूण 11 कोर्ट रूम हॉल आहेत. तरी देखील शहरासाठी 5 न्यायाधीश काम पाहत होते.न्यायाधीशांची अपुरी संख्या व कामाचा वाढता ताण याची दखल घेऊन पिंपरी चिंचवड ॲडव्होकेट्स बार असोसिएशनचे माजी अध्यक्ष ॲड. नारायण रसाळ, व कार्यकरणीतील माजी उपाध्यक्ष ॲड. जयश्री कुटे, माजी सचिव ॲड. गणेश शिंदे, माजी महिला सचिव ॲड. प्रमिला गाडे, माजी सहसचिव ॲड. मंगेश नढे, माजी खजिनदार ॲड. विश्वेश्वर काळजे, माजी ऑडिटर ॲड. राजेश रणपिसे, माजी सभासद ॲड. सौरभ जगताप, ॲड. स्वप्निल वाळुंज, ॲड. अक्षय केदार, ॲड. नितिन पवार, ॲड. पवन गायकवाड, ॲड. प्रशांत बचूटे यांनी वेळोवेळी मुंबई उच्च न्यायालय, जिल्हा न्यायालय पुणे येथे जादा कोर्ट, तसेच सिनिअर डिव्हिजन व सत्र न्यायालय यासाठी पाठपुरावा केला.

PCMC : पाणीपुरवठ्याचा प्रश्न सोडविण्यासाठी समिती गठित, विभागीय आयुक्त घेणार दोन महिन्याला आढावा

पिंपरी चिंचवड ॲडव्होकेट्स बार असोसिएशन, (Pimpri)पिंपरी चिंचवड ॲडव्होकेट्स सोसायटी या संघटनांच्या वतीने करण्यात आलेल्या पाठपुराव्याला यश आले आहे. सोमवार (दि. 11) पासून चार दिवाणी न्यायाधीश क. स्तर तथा प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी कोर्टाचे कामकाज सुरू होणार आहे. त्यामुळे पिंपरी न्यायालयात आता नऊ कोर्ट होणार आहेत. कोर्ट संख्या वाढल्याने कामावरील ताण कमी होणार आहे. याचा पिंपरी चिंचवड शहरातील सर्व पक्षकारांना फायदा होणार आहे. नव्याने चालू होणाऱ्या जादा कोर्टामुळे दावे लवकर निकाली होण्यास मदत होणार आहे.

पिंपरी चिंचवड शहराची वाढती लोकसंख्या व दाव्यांची संख्या लक्षात घेऊन लवकरच मोशी येथील जागेमध्ये विस्तृत कोर्टाचे भूमीपूजन होऊन इमारतीचे काम देखील चालू होणार आहे.

 

 

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.