Pimpri Corona Update : आजपर्यंतचा रुग्णवाढीचा उच्चांक! शहरात आज नवीन 5 हजार 182 रुग्णांची नोंद

2 हजार 566 कोरोनामुक्तांना डिस्चार्ज

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहरात कोरोनाच्या रुग्णसंख्येतील वाढ सुरुच आहे. शहराच्या विविध भागातील 5 हजार 182 नवीन कोरोना बाधित रुग्णांची आज (शुक्रवारी) नोंद झाली. कोरोना विषाणू सुरु झाल्यापासून सर्वांधिक रुग्णसंख्येची आज नोंद झाली आहे. तर, कोरोनामुक्त झालेल्या 2 हजार 566 जणांना डिस्चार्ज देण्यात आला.

कोरोनामुळे महापालिका हद्दीमधील दोन आणि महापालिका हद्दीबाहेरील एक अशा तीन रुग्णाचा आज मृत्यू झाला. आजपर्यंत शहरातील 4 हजार 535 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. शहरातील 3 लाख 18 हजार 299 जणांना आजपर्यंत कोरोनाची लागण झाली. सध्या 23 हजार 492 सक्रिय रुग्ण शहरात आहेत. त्यातील 22 हजार 920 रुग्ण गृहविलगीकरणात असून 572 सक्रीय रूग्णांवर महापालिका रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत.

तर, शहरात मेजर कंटेन्मेंट झोन 118 आणि मायक्रो कंटेन्मेंट झोन 666 आहेत. आज दिवसभरात 13 हजार 168 नागरिकांचे लसीकरण झाले. आजपर्यंत 32 लाख 8 हजार 575 जणांनी कोरोना प्रतिबंधक लस घेतली.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.