Pimpri Corona Update : शहरात आज 166 नवीन रुग्णांची नोंद

एमपीसी न्यूज : पिंपरी चिंचवड शहराच्या विविध (Pimpri Corona Update) भागातील 166 नवीन कोरोना  रुग्णांची आज (रविवारी) नोंद झाली.  तर, 174 कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला.
कोरोनामुळे महापालिका हद्दीतील एकाही रुगणाचा मृत्यू झाला नाही. आजपर्यंत शहरातील 4 हजार 625 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. शहरातील 3 लाख 66 हजार 752 जणांना आजपर्यंत कोरोनाची लागण झाली आहे. सध्या 1 हजार 325 सक्रिय रुग्ण शहरात आहेत. त्यातील 1 हजार 318 रुग्ण गृहविलगीकरणात उपचार घेत आहेत.
तर, केवळ 8 रुग्ण महापालिका रुग्णालयामध्ये दाखल (Pimpri Corona Update) आहे.
आज  दिवसभरात 2 हजार 629 नागरिकांचे लसीकरण झाले आहे. आजपर्यंत 37 लाख 0 हजार 705 जणांनी कोरोना प्रतिबंधक लस घेतली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.