Junnar : आळे फाटा येथे अज्ञात वाहनाच्या धडकेत बिबट्या जखमी

एमपीसी न्यूज : जुन्नर (Junnar) तालुक्यातील आळे फाटा येथे काल 23 जुलै रोजी अज्ञात वाहनाच्या धडकेत बिबट्या जखमी झाल्याची घटना घडली. 
अधिक माहिती देताना वैभव काकडे वनपरिक्षेत्र अधिकारी ओतूर म्हणाले की, “कल्याण – नगर हायवेवरील आळे फाटा जवळील महावितरण पॉवर स्टेशनच्या समोर अज्ञात वाहनाने बिबट्यास रस्ता ओलांडत असताना धडक दिली. यामध्ये बिबटया जखमी झाला.”

सदर बिबट्या हा नर जातीचा असून पाच ते सहा वर्षाचा आहे. वनपरिक्षेत्र ओतूर यांचे कर्मचारी व रेस्क्यू टीम तसेच वाईल्डलाईफ एसओएस (wildlife sos) माणिकडोह यांच्यासह जागेवर तत्काळ पोहोचून बिबट्यास रेस्क्यू केले.
सदर बिबट्यास वनपाल निवासस्थान आळे येथे प्राथमिक उपचार करून माणिकडोह रेस्कु सेंटर जुन्नर येथे पुढील उपचारासाठी हलवण्यात आले आहे.
ही कार्यवाही अमोल सातपुते उपवनसंरक्षक जुन्नर व अमित भिसे, सहाय्यक वनसंरक्षक जुन्नर यांच्या मार्गदर्शनाखाली वैभव काकडे वनपरिक्षेत्र अधिकारी ओतूर, संतोष साळुंखे वनपाल आळे, रवींद्र गवांदे वनपाल, त्रंबक जगताप वनरक्षक राजुरी, कैलास भालेराव वनरक्षक आळे यांनी केली. बिबट्यावर (Junnar) पुढील उपचार डॉ. निखिल बनगर यांच्यामार्फत माणिकडोह रेस्कु सेंटर जुन्नर येथे सुरू आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.