Sinhagad : रविवारच्या सुट्टीचा आनंद घेण्यासाठी पर्यटकांची सिंहगडावर गर्दी

एमपीसी न्यूज : आज रविवारची सुट्टी असल्याने सिंहगड किल्ला (Sinhagad) परिसरात पर्यटकांची गर्दी होती. सिंहगड किल्ला व आसपासचा परिसर हा पुणे जिल्ह्यातील एक लोकप्रिय पर्यटन स्थळ आहे. पावसाळ्यात आसपासचा डोंगर परिसर हिरवगार होतो व अनेक धबधबे वाहू लागतात. त्यामुळे पुणे, पिंपरी चिंचवड शहर तसेच जिल्ह्यातील लाखो पर्यटक पावसाळ्यात या किलल्यावर वर्षाविहारासाठी येत असतात.
पश्चिम घाट परिसरात जुलैच्या तिसऱ्या आठवड्यात मुसळधार पाऊस झाल्याने नदी, ओढे, नाल्यांना पूर आला होता. काही ठिकाणी दरड कोसळली होती. त्यामुळे जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी पर्यटकांना किल्ले, पर्यटन स्थळे येथे पर्यटकाना जुलै 14 ते 17 जुलैपर्यंत जाण्यास बंदी केली होती. आता बंदी नसल्याने सर्व किल्ले व पर्यटनस्थळावर पर्यटकांची गर्दी अपेक्षित होती.

 “सिंहगड किल्ला परिसरात रात्रीपासून पाऊस येत असल्याने पर्यटकांनी आज सकाळपासून गर्दी केली होती. ते मनमुराद वर्षाविहाराचा आनंद घेत होते,” असे सिंहगडाच्या पायथ्याशी असलेल्या डोणजे गावातील रहिवासी बाजीराव पार्गे म्हणाले.

सिंहगड किल्ला (Sinhagad) व आसपासचा परिसर हा पुणे जिल्ह्यातील एक लोकप्रिय पर्यटन स्थळ आहे. पावसाळ्यात आसपासचा डोंगर परिसर हिरवगार होतो व अनेक धबधबे वाहू लागतात. त्यामुळे पुणे, पिंपरी चिंचवड शहर तसेच जिल्ह्यातील लाखो पर्यटक पावसाळ्यात या किल्ल्यावर वर्षाविहारासाठी येत असतात.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.