Pimpri News: गृहनिर्माण सोसायट्या, दुकाने, मॉलमधील नागरिकांची ‘फिरते कोविड’ पथक करणार रॅपिड अँटीजेन चाचणी

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहरातील गृहनिर्माण सोसायट्या,  दुकाने, मॉल इत्यादी ठिकाणच्या नागरिकांची रॅपिड अँटीजेन तपासणी करण्यात येणार आहे. त्यासाठी क्षेत्रीय अधिकारी, ज्येष्ठ वैद्यकीय अधिकारी, रुग्णालय झोन स्तरावर फिरते कोविड 19 पथक स्थापन करण्यात आले आहे. याबाबतचा निर्णय महापालिका आयुक्त राजेश पाटील यांनी घेतला आहे.

पिंपरी-चिंचवड शहरात कोरोनाच्या रुग्णसंख्येत झपाट्याने वाढ होत आहे. मागील दोन महिन्यांपासून रुग्णसंख्येचा आलेख चढताच आहे. दिवसेंदिवस हा आलेख उंचावत  आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी तसेच  शहरातील वाढती रुग्णसंख्या नियंत्रणात आणण्यासाठी महापालिकेकडून विविध उपाययोजना केल्या जात आहेत.

महापालिकेने कोरोना चाचण्या करण्यावर भर दिला आहे. शहरातील गृह निर्माण सोसायट्या, बाजारपेठामधील दुकाने, मॉल इत्यादी ठिकाणच्या नागरिकांची रॅपिड अँटीजेन तपासणी करण्यात येणार आहे. त्यासाठी क्षेत्रीय अधिकारी, क्षेत्रीय कार्यालय, ज्येष्ठ वैद्यकीय अधिकारी आणि  रुग्णालय झोन स्तरावर फिरते कोविड 19 पथकाची स्थापना करण्यात आली आहे.

या पथकामार्फत नागरिकांची कोरोनाची रॅपिड अँटीजेन तपासणी करण्यात येणार आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.