Pune News : मेट्रो स्टेशनपर्यंत पोहचण्यासाठी ‘पीएमपीएमएल’ची फिडर सेवा, पाहा वेळापत्रक

एमपीसी न्यूज – पीएमपीएमएल कडून पुणे व पिंपरी-चिंचवड शहरांतील मेट्रो स्टेशन्ससाठी फिडर बससेवा सुरु करण्यात आली आहे. ‘पुणे महामेट्रो’ व ‘पीएमपीएमएल’चे व्यवस्थापकीय संचालक यांच्या हस्ते आज (दि.21) फिडर बससेवेचा शुभारंभ झाला.

गरवारे मेट्रो स्टेशन येथून या फिडर बस सेवेचा शुभारंभ पुणे महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक ब्रिजेश दीक्षित, पीएमपीएमएलचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक लक्ष्मीनारायण मिश्रा व सहव्यवस्थापकीय संचालिका डॉ. चेतना केरूरे यांच्या हस्ते बसला हिरवा झेंडा दाखवून करण्यात आला.

यावेळी पुणे महा मेट्रोचे संचालक विनोद कुमार अग्रवाल, संचालक अतुल गाडगीळ, जनसंपर्क अधिकारी हेमंत सोनावणे, पीएमपीएमएलचे जनरल मॅनेजर सुनिल गवळी, मुख्य वाहतूक व्यवस्थापक दत्तात्रय झेंडे, वाहतूक नियोजन व संचलन अधिकारी चंद्रकांत वरपे, कामगार व जनता संपर्क अधिकारी सतिश गाटे आदी मान्यवर उपस्थित होते.

पीएमपीएमएल कडून सुरु करण्यात येत असलेल्या या फीडर बससेवेमुळे प्रवाशी नागरिकांना मेट्रो स्टेशन्स पर्यंत पोहोचणे सोयीचे होणार आहे. तसेच या सेवेसाठी मिडी बसेस संचलनात असतील त्यामुळे वाहतूक कोंडी टाळण्यास देखील मदत होणार आहे.

असे आहे वेळापत्रक – 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.