Pune News : पुण्यात चर्चा अजित पवारांच्या बॅनरची, लिहिलंय ‘तालमीतल्या पैलवानाचा नाद करू नका’

एमपीसी न्यूज – अजित पवार यांच्याशी संबंधित लोकांवर आणि कारखान्यांवर आयकर विभागाने छापेमारी केल्यामुळे मागील काही दिवसांपासून ते चर्चेत आहे. परंतु आज दिवसभरात पुण्यात चर्चा होती ती अजित पवारांच्या बॅनरची. अजित पवार यांच्या समर्थनार्थ त्यांच्या समर्थकांनी पुण्यात काही बॅनर्स लावलेत. या बॅनर मध्ये त्यांच्या हातात तलवार दिसून येत आहे. त्यामुळे हे बॅनर आज दिवसभरात चर्चेत होते.

पुण्याच्या भारती विद्यापीठ परिसरातील नगरसेवक युवराज बेलदरे यांनी अजित पवारांच्या समर्थनार्थ हा बॅनर लावला आहे. जत्रेत खेळणाऱ्या पैलवानांनी तालमीत खेळणाऱ्या पहिलवानाचा नाद करू नये, समझनेवालों को इशारा काफी है असा मजकूर या बॅनरवर लिहिण्यात आलाय. तसेच या बॅनरवर अजित पवारांचा हातात तलवार घेतलेला फोटोही आहे.

अजित पवारांची संबंधित असणाऱ्या व्यक्तींवर आयकर विभागाने छापेमारी केल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये संतापाचे वातावरण पसरलं होतं. त्यामुळं अजित पवारांना समर्थन देण्यासाठी राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी हे बॅनर लावले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.