Pune : ‘कोरोना’ची लागण झालेला आढळला आणखी एक रुग्ण; पुण्यात एकूण 9 रूग्ण!; रुग्णांची प्रकृती स्थिर

एमपीसी न्यूज – पुणे शहरामध्ये कोरोनाची लागण झालेला आणखी एक रुग्ण आढळला असून पुण्यातील रुग्णांची एकूण संख्या 9 रुग्ण झाली आहे. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. या रुग्णांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर आणि जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी दिली.

अमेरिकेहून 1 मार्च रोजी पुण्यातील नागरिक परत आला होता. त्याची तपासणी 11 मार्च रोजी करण्यात आली, ती पॉझिटिव्ह आली. त्यामुळे कोरोनाच्या एकूण रुग्णांची संख्या 9 वर गेली आहे. या रूग्णांवर उपचार सुरू असून त्यांची प्रकृती स्थिर आहे, अशी माहिती विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर आणि जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी दिली.

संबंधित आणखी बातम्या वाचा –

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.