Pune Corona Update : चिंता वाढली! शहरात आज नवीन 5 हजार 571 रुग्णांची नोंद, 2,335 कोरोनामुक्तांना डिस्चार्ज

एमपीसी न्यूज – पुणे शहरातील कोरोनाच्या रुग्णसंख्येत आज मोठी वाढ पाहायला मिळाली. शहराच्या विविध भागातील 5 हजार 571 नवीन कोरोना बाधित रुग्णांची आज (गुरूवारी) नोंद झाली. तर, उपचाराला दहा दिवस पूर्ण झालेल्या आणि कोणतीही लक्षणे नसलेल्या 2 हजार 335  जणांना डिस्चार्ज देण्यात आला. 

कोरोनामुळे शहरातील दोन रुग्णांचा आज मृत्यू झाला. आजपर्यंत शहरातील 9 हजार 133 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. शहरातील 5 लाख 42 हजार 989 जणांना आजपर्यंत कोरोनाची लागण झाली. सध्या 25 हजार 737 सक्रिय रुग्ण शहरात आहेत, यामध्ये आज दिवसभरात 5 हजार 571 नवीन कोरोना बाधित रुग्णांची नव्याने नोंद झाली.

तर, शहरात आज दिवसभरात 19 हजार 868 नागरिकांची कोरोना चाचणी करण्यात आली. आजपर्यंत 40 लाख 48 हजार 172 कोरोना चाचण्या करण्यात आल्या आहेत.

शहरात कोरोना रुग्णवाढीचा वेग पुन्हा वाढू लागला आहे त्यामुळे नागरिकांनी स्वतःची काळजी घेण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.