Pune Corona Update: आरोग्य यंत्रणेवर ताण, अत्यवस्थ रुग्णांची संख्या वाढली

Pune Corona Update: Stress on health system, number of emergency patients increased आता दररोज पाच हजारांच्या घरात कोरोनाच्या चाचण्या केल्या जात आहेत. त्यामुळे नवीन रुग्ण सापडण्याचे प्रमाणही वाढले आहे.

एमपीसी न्यूज- दिवसेंदिवस वाढत जाणाऱ्या कोरोनाच्या रुग्णांमुळे महापालिकेच्या आरोग्य यंत्रणेवर प्रचंड ताण असल्याचे दिसून येत आहे. वाढत्या रुग्ण संख्येपुढे पुणे महापालिका आणि खासगी रुग्णालयांमधील व्हेंटिलेटर, ऑक्सिजन आणि बेड कमी पडत आहेत. त्यामुळे अत्यवस्थ असणाऱ्या रुग्णांची संख्या कमालीची वाढताना दिसत आहे. सद्यपरिस्थितीत पुण्यातील 502 रुग्ण अत्यवस्थ आहेत. तर 76 रुग्णांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले आहे.

गुरुवारी पुण्यात निवृत्त शास्त्रज्ञ डॉक्टर लक्ष्मी नरसिंह यांना व्हेंटिलेटर बेड मिळाला नसल्यामुळे त्यांचा मृत्यू झाला. या घटनेवरून शहरातील वैद्यकीय सुविधा या कोरोना रुग्णासाठी अपुऱ्या पडत असल्याचे दिसत आहे.

सध्या महापालिकेने कोरोनाच्या चाचण्याचे प्रमाणही वाढले आहे. आता दररोज पाच हजारांच्या घरात कोरोनाच्या चाचण्या केल्या जात आहेत. त्यामुळे नवीन रुग्ण सापडण्याचे प्रमाणही वाढले आहे.

या नवीन रुग्णात अत्यवस्थ रुग्ण सापडण्याचे प्रमाण सर्वाधिक आहे. त्यामुळे या रुग्णांना ऑक्सिजन व्हेंटिलेटर आणि बेड मिळत नसल्यामुळे नातेवाईकांची गैरसोय होताना दिसून येत आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.