Pune Crime : पुण्यात व्यसनमुक्ती केंद्रात शुल्लक कारणावरून एकाचा गळा आवळून खून

एमपीसी न्यूज : पुण्यातील (Pune Crime) सिंहगड रस्ता परिसरातील एका व्यसनमुक्ती केंद्रात शुल्लक कारणावरून टॉवेलने गळा आवळून एका व्यक्तीचा खून करण्यात आला. आज सकाळी सात वाजताच्या सुमारास धायरी परिसरातील युनिक फाउंडेशन व्यसनमुक्ती केंद्रात हा प्रकार घडला. अजिंक्य सुरेश गुळमिरे (वय 35 वर्ष, सध्या रा. युनिक फाउंडेशन व्यसन मुक्ती केंद्र, धायरी पुणे) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. या प्रकरणी आरोपी सौरभ गणेश सावळे (वय 21 वर्ष) याला अटक करण्यात आली आहे.

Pimpri Chinchwad Ganeshotsav : औद्योगिक नगरी पिंपरी चिंचवडमध्ये पावसाच्या सरीत पर्यावरणपूरक गणपतींचे आगमन

याप्रकरणी अधिक माहिती अशी की, मयत आणि आरोपी या दोघांनाही दारू पिण्याचे व्यसन होते. हे व्यसन सोडण्यासाठी याच महिन्यात हे दोघेही धायरी येथील व्यसनमुक्ती केंद्रात दाखल झाले होते. काही दिवसांपूर्वीच दाखल झालेल्या या दोघांमध्ये सातत्याने किरकोळ कारणावरून वाद होत असतात. आज पहाटेच्या सुमारास देखील त्यांच्यात असाच वाद झाला. त्यानंतर आरोपीने टॉवेलने गळा आवळून अजिंक्य गुळमेरे याचा खून केला.

आज सकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास टॉयलेटला कोण हाती जाणार यावरून त्यांच्यात वाद झाला. हा वाद इतका टोकाला गेला की आरोपी सौरभ सावळे यांनी टॉवेलने गळा आवळून अजिंक्य याचा खून केला. माहिती मिळाल्यानंतर सिंहगड रोड पोलिसांनी घटनास्थळी जाऊन आरोपीला ताब्यात घेतले आहे. अधिक तपास पोलीस करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.