Pune Crime : आरटीओ अधिकाऱ्याला जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी एका एजंटला अटक

एमपीसी न्यूज : आळंदी रोडवरील प्रादेशिक परिवहन कार्यालयातील (Pune Crime) अधिकाऱ्याला जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी पुणे शहर पोलिसांनी एका ‘एजंट’ला अटक केली आहे. निकी फ्रान्सिस स्वामिनाथन (वय 38, रा. आळंदी रोड) असे आरोपीचे नाव असून आरटीओमध्ये तो ‘एजंट’ म्हणून काम करतो.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी दुपारी आरटीओमधील मोटार वाहन निरीक्षक अभिजित गायकवाड (वय 35) ड्युटीवर असताना स्वामिनाथन यांनी त्यांच्यावर कागदपत्रे फेकली. गायकवाड आरटीओमध्ये जुन्या वाहनांच्या पुनर्नोंदणीशी संबंधित काम हाताळतात. त्यानंतर स्वामिनाथन यांनी गायकवाड यांना कागदपत्रांवर सही करण्यास सांगितले आणि तसे न केल्यास जीवे मारण्याची धमकी दिली. स्वामीनाथन यांनी गायकवाड यांच्या महिला सहकाऱ्यालाही धमकी दिल्याचा आरोप आहे.

IND vs AUS 4th Test : गीलच्या शानदार शतकाने भारताची आश्वासक पण शुभ सुरूवात

गायकवाड यांनी दिलेल्या तक्रारीच्या आधारे येरवडा पोलिस ठाण्यात प्रथम (Pune Crime) माहिती अहवाल (एफआयआर) नोंदवण्यात आला. पोलिसांनी भारतीय दंड संहितेच्या कलम 353 (सरकारी कामात अडथळा निर्माण करणे), 332 (लोकसेवकाला त्याच्या कर्तव्यापासून परावृत्त करण्यासाठी स्वेच्छेने दुखापत करणे), 452 (घरात घुसखोरी करणे), 504 (शांतता भंग करण्याच्या हेतूने हेतुपुरस्सर अपमान करणे) आणि 506 अंतर्गत आरोपींवर गुन्हा दाखल केला. या प्रकरणी येरवडा पोलिस ठाण्याच्या पोलिस उपनिरीक्षक स्वप्नाली गायकवाड तपास करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.