Pune Crime News : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची सोशल मीडियावर बदनामी, पुण्यात 13 जणांवर गुन्हे

एमपीसी न्यूज – फेसबुक, व्हाट्सअप आणि ट्विटर वर राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि ज्येष्ठ नेते शरद पवार यांची बदनामी केल्याप्रकरणी पुण्यात 13 जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले. पुणे पोलिसांच्या सायबर पोलीस ठाण्यात हे गुन्हे दाखल करण्यात आलेत. कोथरूडमधील आकाश चंद्रकांत शिंदे (वय 24) यांनी याप्रकरणी फिर्याद दिली आहे.

राजेंद्र पवार, राज पाटील, मुकेश जाधव, स्वरूप भोसले, नाना पंडित, वैभव पाटील, जयसिंग मोहन, संदीप पाटील, शौर्यन श्रीकृष्ण चोरगे, महेश गहुडले, धनंजय जोशी, सोनाली राणे, अतुल अयाचित, अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्यांची नावे आहेत. या सर्वांवर 469, 499, 500, 504, 505 (2), 34 सह माहिती तंत्रज्ञान कायदा 67 नुसार गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

याप्रकरणी अधिक माहिती अशी की, वरील आरोपींनी फेसबुकवरील ‘राजकारण महाराष्ट्राचे’, कोमट बॉईज अँड गर्ल्स फेसबुक ग्रुप, ‘CM Devendra Fadanvis Fan Club’ ग्रुप आणि व्हाट्सअपवरील ‘Intelectual Forum’ या ग्रुपच्या माध्यमातून उद्धव ठाकरे, अजित पवार आणि शरद पवार यांच्या विषयी बदनामीकारक मजकूर प्रसारित केला.

तसेच राजकीय नेत्यांचे फोटो मॉर्फ करुन घाणेरड्या आणि अश्लील भाषेत सोशल मीडियावर कमेंट केल्या. तसेच ब्राह्मण आणि ब्राह्मणेतर इतर जातीय तेढ निर्माण करणाऱ्या पोस्ट केल्या आहेत.

याप्रकरणी तक्रार आल्यानंतर सायबर पोलिसांनी तेरा आरोपींवर गुन्हे दाखल केले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.