Pune Crime News : पत्नीने घटस्फोटाची नोटीस दिल्याच्या  रागातून  मुलीचा खून करत वडिलांचा आत्महत्येचा प्रयत्न

एमपीसी न्यूज – कौटुंबीक न्यालयातून सोडचिठ्ठीची नोटीस दिली म्हणून माथेफिरू पतीने आपल्याच 13 वर्षीय मुलीचा खून करत तिचा मृतदेह ( Pune Crime News ) कॅनॉलमध्ये फेकून स्वतःही विष पिऊन आत्महत्येचा प्रयत्न केला आहे.

याप्रकरणी स्वारगेट पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल कऱण्यात आला आहे. हा प्रकार धनकवडी येथील खंडोबा मंदिराच्या पाठीमागे  गुरुवारी (दि.9) रात्री उशीरा घडला असून शुक्रवारी (दि.10) सकाळी उघडकीस आला आहे.

PMRDA : नागरी नियोजनातील राज्याच्या नाविन्यपूर्ण संकल्पनांचा देशामध्ये गौरव- एकनाथ शिंदे

याप्रकरणी मुलीची आईने स्वारगेट पोलीस ठाण्यात तक्रार दिली असून पती विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी यांनी  आरोपी पतीला कौटुंबीक न्यायालयाद्वारे सोडचिठ्ठी साठी नोटीस पाठवली होती.

त्याचाच राग येवून पतीने 13 वर्षाच्या मुलीला तिच्या आजी-आजोबांच्या घरापासून रिक्षात बसवून सोबत नेले व पत्नीचा राग मुलीवर काढत तिचा खून करून खंड़ोबा मंदिर मागील ( Pune Crime News ) क्रनॉलमध्ये टाकून स्वतः वीष पिऊन आत्महत्येचा प्रयत्न केला आहे. पतीवर उपचार सुरु असून स्वारगेट पोलीस याचा पुढील तपास करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.