Pune : मक्याच्या नावाखाली शेतकरी पिकवत आहेत अफू; पोलिसांनी टाकला छापा

एमपीसी न्यूज : पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यातील पळसदेव (Pune) येथील माळेवाडी येथील सहा शेतकऱ्यांना 7,087 किलो वजनाची अफू पिकवताना पकडण्यात आले. या अफूची किंमत एकूण 1.4 कोटी रुपये आहे.

पोलिसांना निनावी ऑनलाइन तक्रार मिळाली होती. त्यानंतर पोलिसांनी या भागात छापा टाकला. यामध्ये त्यांना शेतकऱ्यांनी परवाना नसताना व्यावसायिक कारणासाठी त्यांच्या मका पिकात अफूची लागवड केल्याचे आढळून आले.

Wakad News : चार दुचाकीसह चोराला अटक, वाकड पोलिसांची कामगिरी

त्यांच्याविरुद्ध अंमली पदार्थ आणि सायकोट्रॉपिक सबस्टन्स (एनडीपीएस) कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र, काही शेतकऱ्यांनी रात्रीच्या वेळी शेतात रोटाव्हेटर फिरवून अफूचे पीक नष्ट केल्याचे वृत्त देखील समोर आले आहे.

सध्या पोलिसांकडून अफूच्या  किंवा अन्य अमली पदार्थ्यांच्या शेतीवर करडी नजर ठेवण्यात येत आहे. अमली पदार्थांची लागवड करणाऱ्या शेतकऱ्यांवर पोलिसांनी कारवाईचा तडाखा लावला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.