Pune : जे पी श्रॉफ यांचा व्होकेशनल एक्सलन्स पुरस्काराने सन्मान

एमपीसी न्यूज – रोटरी डिस्ट्रिक्ट 3131 च्या वतीने(Pune) देण्यात येणारा व्होकेशनल एक्सलन्स पुरस्कार बांधकाम व्यवसायिकांची संस्था असलेल्या क्रेडाई पुणे मेट्रोच्या व्यवस्थापकीय समितीचे सदस्य जे पी श्रॉफ यांना नुकताच प्रदान करण्यात आला.

आपल्या कार्यक्षेत्रात नवीन शोध आणि सतत अत्युत्तम प्रयत्न केल्याबद्दल श्रॉफ यांना रोटरी डिस्ट्रिक्ट 3131 च्या वतीने आयोजित तेजोनिधी या कार्यक्रमात सदर पुरस्काराने गौरविण्यात आले. राज्यसभा खासदार अॅड वंदना चव्हाण यांच्या हस्ते श्रॉफ यांचा यावेळी सन्मान करण्यात आला. रोटरी डिस्ट्रीक 3131 च्या प्रांतपाल मंजू फडके, आयटी तज्ज्ञ व रोटरीचे माजी प्रांतपाल डॉ दीपक शिकारपूर आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.

Pune : भक्त प्रल्हाद कथा कीर्तनातून फुलला भक्तीचा मळा

जे पी श्रॉफ यांच्या मार्गदर्शनाखाली (Pune)कुशल क्रेडाई अंतर्गत आजवर 50 हजारांहून अधिक बांधकाम कामगारांचे यशस्वी कौशल्य प्रशिक्षण घेण्यात आले आहे. साओ पाओलो- ब्राझील, अबु धाबी आणि काझान येथे संपन्न आलेल्या ‘ब्रिकलेइंग आणि टाइलिंग’ प्रकारात जागतिक कौशल्य ऑलिम्पियाडमध्ये त्यांनी भारतीय संघाचे नेतृत्व केले याबरोबरच सर्व स्पर्धांमध्ये उत्कृष्टतेचे पदकही जिंकले हे विशेष.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.