Pune News: अटक वॉरंट रद्द करण्यासाठी लाच स्वीकारताना पोलीस कर्मचारी रंगेहाथ जाळ्यात

एमपीसी न्यूज: अटक वॉरंट रद्द करण्यासाठी लाचेची मागणी करून ती स्वीकारताना एका सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक आला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी रंगेहाथ पकडले. कोंडाजी दामोदर रेंगडे (वय 53) असे लाच स्वीकारणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांची नाव आहे. पुणे ग्रामीण पोलीस दलातील घोडेगाव पोलीस स्टेशन येथे नेमणुकीस आहेत. याप्रकरणी एका 34 वर्षीय व्यक्तीने तक्रार दिली होती. 

याप्रकरणी अधिक माहिती अशी की, तक्रारदार व्यक्तीविरुद्ध घोडेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. कोर्टात या प्रकरणाची सुनावणी आहे. सुनावणीसाठी संबंधित व्यक्ती हजर राहत नसल्याने न्यायालयाने तक्रारदार विरुद्ध वॉरंट काढले होते. हे वॉरंट रद्द करून घेण्यासाठी कोंडाजी रेंगडे त्यांनी फिर्यादी कडे पाच हजार रुपये लाचेची मागणी केली होती. तडजोडीअंती 2000 रुपयावर हा व्यवहार ठरला होता.

दरम्यान संबंधित व्यक्तीने याची माहिती लाचलुचपत विभागाला दिली होती. लाचलुचपत विभागाने या प्रकरणाची खातरजमा करून आरोपीला रंगेहाथ पकडण्यासाठी सापळा रचला होता. त्यानुसार आज लाच स्वीकारताना कोंडाजी रेंगडे त्याला रंगेहात पकडण्यात आले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.