Pune News: पुण्यात थंडीत वाढली मद्य विक्री

एमपीसी न्यूज: अवकाळी पावसानंतर शहरात आता थंडीचा कडाका वाढू लागला आहे. या वाढत्या थंडीचा कडाका बरोबर पुणे जिल्ह्यातील मद्यपानाचा आकडा देखील वाढताना पाहायला मिळतोय. गेल्या वर्षी नोव्हेंबर च्या तुलनेत यंदाच्या नोव्हेंबर मध्ये मद्यविक्री मध्ये लक्षणीय वाढ पाहायला मिळाली आहे.

उत्पादन शुल्क विभागाने दिलेल्या माहितीनुसार गतवर्षीच्या नोव्हेंबर महिन्याच्या तुलनेत यंदा देशी मद्याच्या 3.7 तर विदेशी मद्याची विक्री4.2 टक्क्यांनी वाढली आहे. इतकंचा नव्हे तर बिअरच्या विक्रीत थेट 16.6 टक्क्यांनी वाढ झाकली आहे. वाईनच्या विक्रीत 11.4 टक्क्यांनी वाढ झाल्याची माहिती उत्पादन शुल्क विभागाने दिली आहे.।
दारुचा उत्पादन शुल्क करात 50 टक्क्यांनी घट

देशात महागाई हा एक वेगळा मुद्दा आहे. पेट्रोल, डिझेल, घरगुती गॅस सिलेंडरचे भाव गगनाला भिडले आहेत. या साऱ्या गोष्टी एकीकडे असताना राज्य सरकारने काही दिवसांपूर्वी मद्यप्रेमींसाठी दिलासादायक निर्णय घेतला होता. विदेशातून आयात होणाऱ्या दारुचा उत्पादन शुल्क करात 50 टक्क्यांनी घट केली होती. त्यानंतर आता एक महत्त्वाची माहिती समोर आली आहे. या हिवाळ्यात
पुण्यात दारुविक्रीत कमालीची वाढ झालीय. गेल्यावर्षीच्या तुलनेत यावर्षी दारुविक्रीत प्रचंड वाढ झाल्याचं आकडेवारीतूनच स्पष्ट झालं आहे.

थंडीत दारू पिल्याने हृदयविकाराचा झटका येण्याची शक्यता

थंडी सुरू झाली की, मद्यपानाचे नियोजन अनेक जण करतात. थंडी आणि मद्य हे अनेकांसाठी एक समीकरणच आहे. थंडीच्या दिवसात मद्यपान केल्यास शरीर गरम राहते, असा लोकांमध्ये समज आहे; मात्र थंडीच्या दिवसात रक्त गोठते आणि रक्तवाहिन्या आकुंचन पावतात. हृदयाचे ठोके अनियमित झाल्याने हृदयावर विपरित परिणाम होतो. अशातच वारंवार मद्यपान केल्याने हृदयविकाराचा झटका येण्याची शक्यता वाढते.असे आरोग्य तज्ञ सांगतात.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.