Pune News: खडकीत कर्नाटक राज्याच्या तीन बसेस फोडल्या, 12 ते 14 जणांविरुद्ध गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज: कर्नाटकमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची विटंबना झाल्याचा प्रकार उघडकीस आल्यानंतर राज्यभरात संतप्त वातावरण आहे. वेगवेगळ्या प्रकारे कर्नाटक राज्य सरकारचा निषेध व्यक्त. खडकी ऑर्डिनेंस फैक्ट्रीच्या पाठीमागे बारा ते पंधरा जणांच्या टोळक्याने कर्नाटक राज्य महामंडळाच्या तीन बसेसवर दगडफेक करून तोडफोड केली.

रविवारी दुपारच्या सुमारास हा प्रकार घडला. याप्रकरणी सुधीर जाधव (वय 55) यांनी तक्रार दिली असून खडकी पोलिस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी हे त्यांचे सहकारी एसटीचालक आणि इतर साथीदारांसह कर्नाटक राज्य महामंडळाच्या तीन एसटी बस घेऊन जात होते. खडकीतील ऑडनस फॅक्टरी च्या पाठीमागे असलेल्या मोकळ्या जागेत या बस थांबली असताना दोन चार चाकी व दोन दिवसात पूर्ण आलेल्या अज्ञात बारा ते चौदा जणांनी या बसच्या काचा दगडाने फोडून नुकसान केले. तसेच बसला ऑइल पेंट फासून आणि जोरजोरात घोषणा देऊन बसचे विद्रुपीकरण केले आहे. खडकी पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून पोलीस उपनिरीक्षक शैलजा शिंदे अधिक तपास करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.