Wakad Crime News : कोकणे चौकातील चौपाटीवरून दोघांना अटक; पिस्तुल, पाच जिवंत काडतुसे जप्त

एमपीसी न्यूज – वाकड पोलिसांनी रविवारी (दि. 19) मध्यरात्री पावणे एकच्या सुमारास रहाटणी मधील कोकणे चौकातील चौपाटीवरून दोघांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून पिस्तुल आणि पाच जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली आहे.

अजित रामलखन यादव (वय 25, रा. काळेवाडी. मूळ रा. मध्य प्रदेश), हिमाचल अतरसिंग रावत (वय 24, रा. काळेवाडी, मूळ रा. मध्य प्रदेश) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी पोलीस शिपाई विनायक घारगे यांनी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रहाटणी येथील गस्तीवरील पोलिसांना माहिती मिळाली की, रहाटणी मधील कोकणे चौकातील चौपाटीवर दोघेजण थांबले असून त्यांच्याकडे पिस्तुल आहे. त्यानुसार पोलिसांनी सापळा लावून कारवाई केली. पोलिसांनी अजित आणि हिमाचल या दोघांना ताब्यात घेतले. अजित यादव यांच्याकडून 30 हजार रुपये किमतीची एक गावठी पिस्तुल आणि पाच जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली आहेत. वाकड पोलीस याप्रकरणी तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.