Pune News: चौथ्या मजल्यावरून खाली कोसळल्याने कामगाराचा मृत्यू

एमपीसी न्यूज: चार मजली इमारतीच्या चौथ्या मजल्यावर रंग देण्याचे काम करत असताना खाली पडल्यामुळे एका कामगाराचा मृत्यू झाला आहे. वाघोलीत हा प्रकार घडला. विरबाहद्दुर रघुविर यादव (वय ४२, रा. शिक्रापूर ) असे मृत्यू झालेल्याचे नाव आहे. याप्रकरणी लोणीकंद पोलीस ठाण्यात महारूद्र कंस्ट्रक्शन कंपनीतर्फे श्रीकृष्ण शंकर डोंगरे याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत मेव्हणा शिवमकुमार राजेंद्र कुमार सिंग (वय २३) यांनी तक्रर दिली आहे. हा प्रकार २५ डिसेंबर रोजी घडला आहे. पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार यांचे दाजी व ते भावडी रोडवरील मसाला कंपनीचे जवळील एका चार मजली इमारतीच्या कलरिंगचे काम करत होते. चौथ्या मजल्याला बाहेरील बाजूला कलर देत असताना विरबहाद्दुर हे खाली कोसळले. यात त्यांच्या डोक्याला, हाताला, मनक्याला आणि इतर ठिकाणी गंभीर लागला. त्यांना लागलीच रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांच्यावर उपचार सुरू असताना त्यांचा (दि. २८) मंगळवारी त्यांचा मृत्यू झाला. त्यानंतर याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास लोणीकंद पोलीस करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.