Pune : किरकोळ कारणावरुन झालेल्या वादात एकाचा खून

एमपीसी न्यूज – किरकोळ वादातून एकाला लाथाबुक्क्यांनी बेदम ( Pune) मारहाण करून त्याचा खून केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी सहकारनगर पोलिसांनी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केला.

तुकाराम निवृत्ती कांबळे (वय 57 , रा. समता सोसायटी, सहकारनगर) असे खून झालेल्याचे नाव  असून कुशल शिंदे (रा. समता सोसायटी, सहकारनगर), लखन भिसे आणि शानू यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.  या प्रकरणी एका महिलेने सहकारनगर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

Pune : शहरात अवजड वाहनांना बंदी; वाहतूक कोंडीचा प्रश्न सोडविण्यासाठी पुण्याच्या वाहतूक व्यवस्थेत मोठा बदल

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तुकाराम कांबळे आणि आरोपी शिंदे, भिसे, शानू ओळखीचे आहेत. त्यांच्यात किरकोळ कारणावरून वाद झाला होता. त्यावरून आरोपी 24 फेब्रुवारीला रात्री दीडच्या सुमारास कांबळे यांच्या घरात शिरले. ‘नाना तू माझा भाऊ विशाल याच्यावर खोटा आळ का घेतो, माझ्या भावाची बदनामी का करतो,’ अशी विचारणा करून आरोपी शिंदे आणि साथीदारांनी कांबळे यांना लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली.

मारहाणीत गंभीर जखमी झालेले कांबळे यांना रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. शवविच्छेदन अहवालात कांबळे यांना बेदम मारहाण केल्याने त्यांचा मृत्यू झाल्याचे उघडकीस आले. त्यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल केला. पोलिस उपनिरीक्षक महेश नलावडे तपास करत ( Pune)  आहेत.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.