Pune Rain : पुण्यात मेघगर्जनेसह जोरदार पावसाला सुरुवात

एमपीसी न्यूज : राज्याच्या अनेक भागात 18 मार्चपर्यंत (Pune Rain) जोरदार पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागामार्फत वर्तविण्यात आली होती. त्याच दरम्यान आज पुन्हा दुपारी चार वाजण्याच्या सुमारास पुणे शहर आणि आसपासच्या परिसरात मेघगर्जनेसह जोरदार पावसाला सुरुवात झाली आहे.

Maharashtra Crisis : अखेर 9 महीने 9 दिवसांनी सत्तासंघर्षाची सुनावणी पूर्ण; आता लक्ष न्यायालयाच्या निकालाकडे!

या पावसामुळे नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाल्याचे चित्र (Pune Rain) पाहण्यास मिळाले. तर, रायगड, सातारा, सांगली, कोल्हापूर, परभणी, औरंगाबाद, नाशिक, जालना, हिंगोली, लातूर या भागात देखील पुढील 3 ते 4 तासात जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनी घराबाहेर पडताना खबरदारी घेण्याचे आवाहन हवामान विभागामार्फत करण्यात आले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.