Pune : फडके हौदाजवळील मेट्रोचे नियोजित स्थानक दादोजी कोंडदेव शाळेच्या जागेवर होणार

एमपीसी न्यूज- पुण्यातील फडके हौदाजवळील मेट्रोचे नियोजित स्थानक कसबा पेठेतील दादोजी कोंडदेव शाळेच्या जागेवर हलविण्याचा निर्णय झाला आहे, अशी माहिती महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक ब्रिजेश दीक्षित यांनी गुरुवारी (दि. २०) दिली.

फडके हौद चौकाजवळ मेट्रोचे भुयारी स्थानक होणार होते. त्यामुळे सुमारे 248 कुटुंबांचे स्थलांतर करावे लागणार होते. त्याला परिसरातील रहिवाशांनी विरोध केला होता. त्याबाबत तीन वेळा आंदोलने झाली होती. या पार्श्वभूमीवर मेट्रोचे स्थानक शाळेच्या जागेवर करण्याचा निर्णय महापालिकेच्या मदतीने घेण्यात आला आहे. या शाळेच्या जागेवर परिसरातील रहिवाशांचे स्थलांतर करण्याचा या पूर्वीचा महामेट्रोचा प्रस्ताव होता.

  • नव्या निर्णयामुळे एकाही कुटुंबाचे स्थलांतर करावे लागणार नाही, असेही दीक्षित यांनी सांगितले. शाळेची जागा स्थानकासाठी देण्याची महापालिकेने तयारी दर्शविली आहे. त्याचे प्रवेशद्वारही निश्चित झाले आहे. या निर्णयामुळे स्थानकाच्या खर्चातही बचत होणार आहे, अशी माहितीही त्यांनी दिली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.