Pune News : जेष्ठ नागरिकांना ‘या’ पाच केंद्रांवर रविवारी मिळणार कोव्हिशिल्ड लस

एमपीसी न्यूज – केवळ जेष्ठ नागरिकांसाठी रविवारी (दि.30) शहरातील पाच लसीकरण केंद्रांवर लसीकरणाची व्यवस्था करण्यात आली आहे. कोव्हिशिल्ड लसीचा पहिला, दुसरा आणि प्रिकॉशनरी डोसची व्यवस्था या केंद्रांवर करण्यात आली आहे. 

पुणे महानगरपालिकेच्या पाच रुग्णालयात प्रत्येकी कोव्हिशिल्ड लसीचे 150 डोस देण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. लसीच्या उपलब्ध साठ्यापैकी 50 टक्के डोस ऑनलाईन स्लॉट बुकिंग व 50 टक्के ऑन स्पॉट देण्यात येणार आहेत. यावेळी लसीचा पहिला, दुसरा आणि प्रिकॉशनरी डोस नागरिकांना दिला जाईल.

‘या’ पाच केंद्रांवर रविवारी मिळणार कोव्हिशिल्ड लस ( केवळ ज्येष्ठ नागरिकांसाठी )

  • कोथरूड – बावधन क्षेत्रिय कार्यालय – कै. जयाबाई नानासाहेब सुतार हॉस्पिटल, कोथरूड
  • हडपसर – मुंढवा क्षेत्रिय कार्यालय – कै. सखाराम कुंडलिक कोद्रे दवाखाना, मुंढवा
  • कसबा – विश्रामबागवाडा क्षेत्रिय कार्यालय – कमला नेहरू रुग्णालय, मंगळवार पेठ
  • भवानी पेठ क्षेत्रिय कार्यालय – कै. रोहिदास किराड दवाखाना, गणेश पेठ
  • औंध क्षेत्रिय कार्यालय – औंध कुटी रुग्णालय

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.