Pune Crime : 15 वर्षीय मुलीसोबत लग्न केले, पतीवर बलात्काराचा तर आई-वडिलांसह सासू-सासऱ्यांवर गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज : अल्पवयीन मुलीसोबत लग्न केल्याने आणि ते लग्न लावून दिल्याने पतीसह या मुलीच्या आई वडील आणि सासू-सासर्‍याने विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.(Pune Crime) हडपसर पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पंधरा वर्षाच्या पीडित मुलीने या प्रकरणी तक्रार दिली आहे. 

Pune : पीएमपीएल बसमध्ये महिलेचा विनयभंग, अनोळखी व्यक्तीने केले अश्लील चाळे

या प्रकरणी अधिक माहिती अशी की, पीडित मुलगी ही पंधरा वर्षाची आहे.. हे माहीत असतानाही पीडित मुलीच्या आई-वडिलांनी लग्न लावून दिले होते. त्यानंतर पीडित मुलीने या प्रकरणी पोलिसात तक्रार दिल्याने गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यातील पतीवर बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर आई-वडील आणि सासू-सासर्‍यांवर बालविवाह प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हडपसर पोलीस अधिक तपास करत आहेत.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.