Pune : पीएमपीएल बसमध्ये महिलेचा विनयभंग, अनोळखी व्यक्तीने केले अश्लील चाळे

एमपीसी न्यूज : पी एम पी एम एल बसच्या हडपसर ते निगडी या दरम्यान प्रवास करणाऱ्या एका महिलेसोबत अश्लील वर्तन करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे (Pune) लोहगाव येथील संजय पार्क दरम्यान ही घटना घडली. 27 वर्षीय महिलेने दिलेल्या तक्रारीनंतर अनोळखी व्यक्ती विरोधात विमानतळ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

Pune News : शेळीच्या करडाला दगड मारल्याचा जाब विचारल्याने चुलत्याकडून पुतण्याला मारहाण

या प्रकरणी अधिक माहिती अशी की, फिर्यादी या हडपसर ते निगडी या बसने प्रवास करत होत्या. बस मध्ये ड्रायव्हरच्या डाव्या बाजूला असलेल्या सीटवर त्या बसलेल्या असतानाच (Pune) अनोळखी व्यक्तीने त्यांच्यासमोर येऊन घाणेरडे चाळे त्यांच्यासमोर केले. फिर्यादी यांनी तक्रार दिल्यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. विमानतळ पोलिस अधिक तपास करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.