‘Ayodhya posters : असली आ रहा है, नकली से सावधान’ अयोध्यात पोस्टर्स

एमपीसी न्यूज : युवासेना प्रमुख आणि राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे  यांच्या दौऱ्याआधी अयोध्येत  शिवसेनेकडून  पोस्टरबाजी करण्यात आली आहे. या पोस्टरबाजीतून शिवसेनेने मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. ‘असली येत आहे, नकली पासून सावधान’, अशा शब्दांमध्ये शिवसेनेने पोस्टरच्या माध्यमातून राज ठाकरेंवर निशाणा साधला आहे. राज ठाकरे अयोध्या दौऱ्यावर जाण्याआधी आदित्य ठाकरे हे अयोध्या दौऱ्यावर जाणार आहेत.

 

मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात आदित्य ठाकरे हे अयोध्येचा दौरा करणार आहेत. तर त्यांच्यानंतर 5 जूनला मनसे अध्यक्ष राज ठाकरे  हेही अयोध्या दौऱ्यावर जाणार आहेत. भोंग्यांच्या मुद्द्यावरुन मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सरकारला दिलेल्या आव्हानानंतर, आता अयोध्येत असली आणि नकलीचे पोस्टर्स शिवसेनेकडून लावण्यात आले आहेत. यानिमित्ताने मनसे अध्यक्ष राज ठाकरेंना टार्गेट करण्याचा शिवसेना प्रयत्न आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.