Talegaon Dabhade News : शहरातील रस्त्यांवरील स्पीड ब्रेकर ची दुरुस्ती करा : वैशाली दाभाडे

एमपीसी न्यूज – तळेगाव दाभाडे शहरातील मुख्य व अंतर्गत रस्त्यांवरील स्पीड ब्रेकर (गती रोधक) यांची दुरुस्ती करून त्यावर पांढरे पट्टे मारावेत अशा विषयाची मागणी निवेदनाद्वारे नगराध्यक्षा, विद्यमान नगरसेविका वैशाली दाभाडे यांनी उपमुख्याधिकारी सुप्रिया शिंदे यांच्याकडे केली आहे. 

_MPC_DIR_MPU_II

दाभाडे यांनी निवेदनात म्हटले आहे की  शहरातील काही मुख्य रस्त्यांवरील स्पीड ब्रेकर खराब झालेले आहे. त्यामुळे वाहन चालकांना अडचणी येत आहेत तर काही ठिकाणी अपघात घडत असलेल्या घटना घडलेल्या आहे अशा स्पीड ब्रेकर्सची दुरुस्ती होणे गरजेचे आहे.

शहरातील काही मुख्य व कॉलनीतील अंतर्गत रस्त्यावरील स्पीड ब्रेकर्स वर पांढरे पट्टे नसल्याने खूप वेळा अपघात घडत आहेत. शहरातील सर्व स्पीड ब्रेकर्स(गती रोधकांची) दुरुस्ती करून त्यावर पांढरे पट्टे मारावेत अशी विनंती दाभाडे यांनी निवेदनात केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.