ATM : एटीएम सेंटरमध्ये पडलेल्या एटीएम कार्डवरून काढले दीड लाख रुपये

एमपीसी न्यूज – एटीएम सेंटरमध्ये (ATM) पैसे काढण्यासाठी गेलेल्या व्यक्तीचे एटीएम कार्ड पडले. ते कार्ड अनोळखी व्यक्तीने बदली करून दिले. त्यानंतर अनोळखी व्यक्तीने एटीएम कार्डद्वारे एक लाख 43 हजार 297 रुपये काढून फसवणूक केली. हा प्रकार 14 मार्च ते 15 मार्च या कालावधीत एसबीआय बँकेचे एटीएम गवळीमाथा भोसरी या ठिकाणी घडला.

शिवाजी काशिनाथ संगमे (वय 44, रा. धावडे वस्ती, भोसरी) यांनी याप्रकरणी एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात 30 मे रोजी फिर्याद दिली आहे. त्यानुसार अनोळखी व्यक्तीच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Hinjawadi News : हिंजवडी, निगडी आणि चिखलीमध्ये चोरीच्या चार घटना

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी संगमे गवळीमाथा भोसरी येथील एसबीआय बँकेच्या एटीएम (ATM) सेंटरमध्ये पैसे काढण्यासाठी गेले. त्यावेळी त्यांचे एटीएम कार्ड खाली पडले. ते कार्ड अनोळखी व्यक्तीने बदली करून संगमे यांना दिले. त्यांनतर अनोळखी व्यक्तीने संगमे यांच्या एटीएम कार्डद्वारे एक लाख 43 हजार 297 रुपये वेगवेगळ्या एटीएम वरून काढून घेत संगमे यांची फसवणूक केली. एमआयडीसी भोसरी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.