Sangavi Fraud : दारू घरपोच करण्याच्या बहाण्याने अडीच लाखांची फसवणूक

एमपीसी न्यूज – दारूच्या दुकानातून (Sangavi Fraud) दारू घरपोच करण्याचे आमिष दाखवून एका व्यक्तीची दोन लाख 66 हजारांची फसवणूक केली. हा प्रकार 15 मे रोजी दुपारी पिंपळे सौदागर येथे घडला.

चंद्रशेखर दिवाकर सोमकुंवर (वय 42, रा. पिंपळे सौदागर) यांनी याप्रकरणी गुरुवारी (दि. 26 मे) सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार 7815049265, 8328869022 या मोबाईल क्रमांक धारकाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Pimple Saudagar : पिंपळेसौदागर, रहाटणीतील पाणी समस्या लवकरच सुटणार – नाना काटे

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने फिर्यादी (Sangavi Fraud) यांना फोनवरून संपर्क करून शिवारचौक येथील विनगेट वाईन्स या दुकानातील दारू घरपोच देतो असे आमिष दाखवले. फिर्यादी याच्याकडून प्रथम 864 रुपये, नंतर 70 हजार 838 रुपये घेतले. त्यानंतर हे पैसे परत करतो असे आमिष दाखवून पुन्हा तीन टप्प्यात 48 हजार, 48 हजार आणि 96 हजार रुपये काढून घेतले. आरोपीने फिर्यादी यांची ऑनलाईन माध्यमातून एकूण 2 लाख 63 हजार 702 रुपयांची फसवणूक केली. सांगवी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.