Pimpri News : संस्कार भारतीच्या एकदिवसीय रांगोळी कार्यशाळेला उत्स्फुर्त प्रतिसाद

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेतर्फे 1 ते 3 ऑक्टोबर दरम्यान ‘आजादी का अमृतमहोत्सवा’चे आयोजन केले आहे. त्याच पार्श्वभूमीवर स्वराज्य 75 च्या निमित्ताने संस्कार भारतीतर्फे घेण्यात आलेल्या एकदिवसीय रांगोळी कार्यशाळेला मोठा प्रतिसाद मिळाला. 51 कलाकारांनी त्यात सहभाग घेतला होता.

चापेकर चौकात रविवारी ही कार्यशाळा झाली. पिंपरी-चिंचवड महापालिका व स्मार्टसीटी यांच्या संयुक्त विद्यमाने 1 ते 3 ऑक्टोबर दरम्यान ‘आजादी का अमृतमहोत्सवा’चे आयोजन करण्यात आले आहे. यात विविध कलाकारांना सादरीकरणासाठी निमंत्रण करण्यात आले आहे.

संस्कार भारतीच्या रांगोळी विधेला खास निमंत्रण देण्यात आले आहे. रांगोळी विधेसाठी दोन दिवसात 51 कलाकारांनी ऑनलाईन नावनोंदणी केली. त्यांचे शिबिर झाले. त्यांनी रांगोळीचा सराव केला. या एक दिवसीय कार्यशाळेला प्रमुख प्रशिक्षक ज्योती कोल्हे व अनिता रोकडे यांचे मार्गदर्शन लाभले.

विधा प्रमुख गौरी कारंडे, चित्रकला सहविधा प्रमुख लिना आढाव, रांगोळी कलाकार प्राजक्ता काळभोर व इतर कलाकार उपस्थित होते. संस्थेचे अध्यक्ष सचिन काळभोर, सचिव हर्षद कुलकर्णी, खजिनदार सायली देवधर,अमोल देशपांडे हे देखील उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.