Pimpri News : ज्येष्ठ विनोदी कवी अशोक नायगावकर यांची सातव्या महाकाव्यसंमेलनाध्यक्ष पदी निवड

एमपीसी न्यूज – नक्षञाचं देणं काव्यमंच, मुख्यालय, भोसरी व सह्याद्री युथ फांऊडेशन, महाराष्ट यांच्या संयुक्त विद्यमाने सातवे ‘अखिल भारतीय मराठी नक्षञ महाकाव्यसंमेलन 2022’ चे आयोजन करण्यात आले आहे. या  महाकाव्यसंमेलनाध्यक्ष पदी ज्येष्ठ विनोदी कवी अशोक नायगावकर यांची निवड करण्यात आली आहे.

हे संमेलन 14 आणि 15 मे 2022 रोजी तुकारामनगर पिंपरी येथील आचार्य अत्रे रंगमंदिर येथे होणार आहे. या महाकाव्यसंमेलनात सर्वांना मुक्तप्रवेश आहे. अशोक नायगावकर यांची संस्थेच्या वतीने एकमताने निवड करण्यात आली आहे. या निवडीबद्दल कवी अशोक नायगावकर यांनी आनंद व्यक्त केला आहे.

अशोक नायगावकर म्हणाले, “मागील सहा महाकाव्यसंमेलने उत्तम आयोजन करुन संपन्न झाली आहेत. महान कवींनी या महाकाव्यसंमेलनाचे अध्यक्ष पद स्विकारुन संस्थेच्या कार्याचा गौरव केलेला आहे. सातव्या अखिल भारतीय मराठी नक्षञ महाकाव्यसंमेलनाच्या अध्यक्षपदी माझी निवडकेल्याबद्दल संस्थेचा मी आभारी आहे. त्यांच्या संयोजनासाठी, संपन्नतेसाठी माझ्या शुभेच्छा. हे महाकाव्यसंमेलन उत्तमप्रकारे यशस्वी होणार आहे. कवींना समाजाला जपले पाहीजे. कवितेतून समाजप्रबोधन होत असते, असेही नायगावकर म्हणाले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.