Dehuroad Crime News : सावत्र आईच्या नातेवाइकाने केला लैंगिक अत्याचार 

बदनामी करणारा व्हिडिओ देखील केला शेअर 

एमपीसी न्यूज – सावत्र आईच्या नातेवाइकानेच लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. आरोपीने 2017 पासून महिलेवर लैंगिक अत्याचार केला तसेच, बदनामी करणारा व्हिडिओ नातेवाईकांच्या व्हाट्सअपला शेअर केला. 17 फेब्रुवारी 2021 रोजी किवळे, ता. हवेली याठिकाणी हि घटना उघडकीस आली. 

याप्रकरणी पिडित महिलेनं देहूरोड पोलीस ठाण्यात शुक्रवारी (दि. 26) फिर्याद दिली आहे. त्यानुसार आरोपी अमोल दिलीप नांगरे (रा. कामेरी, ता. वाळवा, सांगली) याच्या विरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी अमोल हा फिर्यादी महिलेच्या सावत्र आईचा नातेवाईक आहे. आरोपी व फिर्यादी 2017 ते 24 डिसेंबर 2020 या कालावधीत किवळे याठिकाणी एकत्र रहायला होते. याकाळात आरोपीने फिर्यादी महिलेला धमकावत जबरदस्तीने शारीरिक संबंध प्रस्थापित करण्यास भाग पाडले. दरम्यान, 24 डिसेंबर 2020 रोजी मुलीची तब्येत खराब झाल्याने तिला पाहण्यासाठी फिर्यादी महिला आपल्या मुळ गावी गेली. आरोपी महिलेच्या गावी पोहचला व ‘तू माझ्या सोबत आली नाहीस तर तुझा बदनामी करणारा व्हिडिओ प्रसारित करेन’ तसेच, ‘तुझ्या नावाची चिठ्ठी लिहून आत्महत्या करेन’ अशी धमकी दिली.

आरोपीने फिर्यादी महिलेचा बदनामी करणारा व्हिडिओ तयार करून महिलेच्या नातेवाईकांना पाठवला. तसेच, महिलेविषयी बदनामी करणारा संदेश लिहून तिच्या घराजवळ चिकटवला असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. याप्रकरणी देहूरोड पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक गावडे अधिक तपास करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.