Shane Warne dies : धक्कादायक ! ऑस्ट्रेलियन फिरकीपटू शेन वॉर्न याचे निधन 

एमपीसी न्यूज – जगातील सर्वश्रेष्ठ फिरकीपटू पैकी एक असलेल्या ऑस्ट्रेलियन क्रिकेटर शेन वॉर्न याचे ह्रदय विकाराच्या झटक्याने निधन झाले आहे. क्रिकेट विश्वासाठी ही अतिशय धक्कादायक बातमी आहे. शेन वॉर्न याचे वय 52 वर्षे होते. फॉक्स स्पोर्ट्स या वृत्त वाहिनीने या वृत्ताला दुजोरा दिला आहे.  
‘वॉर्न थायलंड येथे होता आणि तेथे त्याला हार्ट अटॅक आल्याचे सांगण्यात येत आहे. शेन त्याच्या व्हिलामध्ये प्रतिसाद देत नसल्याचे आढळले. वैद्यकीय उपचार देण्यात आले मात्र प्रयत्न अपयशी ठरले,’ असे वॉर्नच्या मॅनेजमेंट टीमनेही दिलेल्या स्टेटमेंट म्हटले आहे.

शेन वॉर्नच्या निधनानंतर क्रिकेट विश्वातून हळहळ व्यक्त केली जात आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.