Pune News : लग्नाच्या आमिषाने आतेभावानेच केला बलात्कार

पुण्याच्या कोथरूड परिसरातील घटना

एमपीसी न्यूज :  कोथरूड परिसरातून नात्याला काळीमा फासणारी घटना उघडकीस आलीये. लग्नाचे आमिष दाखवून आतेभावानेच एका तरुणीवर वारंवार बलात्कार केला आहे. पीडित तरुणीची प्रसूती झाल्यानंतर हा सर्व प्रकार उघडकीस आला. कोथरूड पोलीस स्टेशन मध्ये या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीला ताब्यातही घेतले आहे. वीस वर्षीय तरुणीने याप्रकरणी फिर्याद दिली आहे.

याप्रकरणी अधिक माहिती अशी की, नोव्हेंबर 2019 ते फेब्रुवारी 2020 या कालावधीत आरोपी गप्पा मारण्याचा निमित्ताने पीडितेच्या घरी येत होता. याच कालावधीत त्याने पीडित अशी जवळीक साधून लग्न करण्याच्या आमिषाने तिच्यावर वारंवार बलात्कार केला. यातून पीडिता गर्भवती राहिली आणि काही दिवसांपूर्वी तिने एका बाळाला जन्म दिला.

दरम्यान आरोपीने घरच्यांना न सांगण्याची धमकी दिल्याने पीडितेने कुटुंबियांपासून हा सर्व प्रकार लपवला होता. परंतु पीडित तरुणीची प्रसूती झाल्यानंतर हा सर्व प्रकार उघड झाला. त्यानंतर पीडित तरुणीच्या कुटुंबीयांनी न्यायासाठी पोलीस स्टेशनमध्ये धाव घेतली. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून आरोपीला ताब्यात घेतले आहे. अधिक तपास सुरू आहे

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

_MPC_DIR_MPU_III