Shirur Murder: त्या खूनाचा अखेर उलगडा, अंघोळीचा बहाणा करून पतीनेच…केला पत्नीचा खून

एमपीसी न्यूज: आठ दिवसांपूर्वी शिरूर तालुक्यातील एका विहिरीत एका महिलेचा आणि पाच महिन्याच्या मुलाचा मृतदेह सापडला होता. या खूनाची उकल करण्यात अखेर पुणे ग्रामीण पोलिसांना यश आले आहे. पत्नीवर असलेल्या चरित्राच्या संशयातून पतीनेच या दोघांचा खून केल्याचे निष्पन्न झाले आहे.(Shirur Murder) योगेश संभाजी कुराडे (वय 22) याला शिरूर पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्या विरोधात खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला.

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शिरूर तालुक्यातील अण्णापूर गावातील एका निर्जनस्थळी असलेल्या विहिरीत महिलेचा आणि चिमुकल्याचा मृतदेह सापडले होते.(Shirur Murder) दरम्यान कुठलाही पुरावा नसताना घटनेचे धागेदोरे शोधणे त्याचं मोठं आव्हान पोलिसांसमोर होतं. सुरुवातीला हा सर्व प्रकार आत्महत्या असावा असा अंदाज वर्तवला होता. मात्र जवळच असणाऱ्या शेतात साडी सापडल्याने घातपाताचा संशय बळावला होता. त्यानंतर पोलिसांनी मयत महिलेची ओळख पटावी यासाठी सोशल मीडियावर फोटो व्हायरल केले होते. त्यातून एका व्यक्तीकडून ओळख पटल्यानंतर पोलिसांनी मयत महिलेच्या पतीला सोने सांगवी येथून ताब्यात घेतले. त्यानंतर त्याने खून केल्याची कबुली दिली.

Pune Suicide: ऑनलाइन रमीच्या व्यसनातून कर्जबाजारी झाल्याने तरुणाची आत्महत्या

याप्रकरणी अधिक माहिती अशी की, कुऱ्हाडे दांपत्य मूळचे पैठणचे. मागील वर्षभरापासून ते शिरूर तालुक्यातील कवठे येमई या ठिकाणी राहत होते. योगेश हा विहीर खोदायचे काम करत होता. पत्नी रूपाली हिच्यावर तो सातत्याने संशय घ्यायचा.(Shirur Murder) यावरून त्यांच्यात भांडण देखील होत होते. दरम्यान सात ऑगस्ट रोजी तो आंघोळ करायची आहे म्हणून पत्नीला एका निर्जनस्थळी असलेल्या विहिरीवर घेऊन गेला. या ठिकाणी त्यांच्या पुन्हा एकदा भांडण झाले. त्यानंतर रागाच्या भरात त्याने पत्नी आणि मुलाला विहिरीत ढकलून दिले. या घटनेत दोघांचाही विहिरीत बुडून मृत्यू झाला. त्यानंतर तो घटनास्थळावरून फरार झाला होता.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.