Pune Crime News : धक्कादायक! डिपॉझिट परत मागितल्याच्या रागातून घरमालकिणीची पेईंग गेस्ट मुलींना मारहाण

एमपीसी न्यूज – पेईंग गेस्ट राहणाऱ्या मुलींनी घर सोडून जाताना दिलेले डिपाॅझिट परत मागितल्याचा रागातून घर मालकिणीने दोन मुलींना मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. चंदन नगर परिसरात ही घटना घडली. चंदन नगर पोलिस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

20 आणि 21 वर्षीय मुलींना कोंडून ठेवून मारहाण केल्याची तक्रार चंदनगर पोलीस ठाण्यात देण्यात आली होती. त्यानंतर पोलिसांनी तृप्ती माने आणि श्वेता थोरात या दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

याप्रकरणी अधिक माहिती अशी की, पीडित दोन तरूणी चंदन नगर परिसरात पेईंग गेस्ट म्हणून राहत होत्या. त्यानंतर त्या भागातील रूम सोडताना त्यांनी घर मालकीण तृप्ती माने यांच्याकडे डिपॉझिटचे पैसे परत देण्याची मागणी केली. परंतु तृप्ती माने यांनी पैसे परत न देता श्वेता थोरात यांच्या मदतीने मारहाण केल्याचे तक्रारीत म्हटले आहे. यानंतर या मुलींनी पोलीस स्टेशन गाठून तक्रार दिली. पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सुरू आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.