Crime News : दुकानातील कामगाराने पावणेचार लाखाचा माल चोरला

एमपीसी न्यूज – दुकानातील कामगाराने 3.84 लाख रुपये किमतीचा माल चोरून नेल्याची घटना भाबोली गावाच्या हद्दीत घडली आहे. याबाबत दुकानमालक राजू रौंधळ (वय 37, रा.पाईट, ता.खेड) यांनी महाळुंगे पोलीस ठाण्यात 14 सप्टेंबर रोजी फिर्याद दिली आहे.

राजू मासेकरी (वय44 ,मूळ रा.डोंबिवली वेस्ट, कल्याण- ठाणे) या आरोपी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.ही चोरी 13 सप्टेंबर रोजी सकाळी 7.30 वा ते 8 वा दरम्यान भाबोली गावात आर. आर. एंटरप्राइजेस नावाच्या दुकानात घडली आहे.

फिर्यादी यांच्या स्वतःच्या मालकीच्या आर. आर. इंटरप्राईजेस नावाच्या दुकानातील कामगार आरोपी याने 1.56 लाख रुपये किंमतीचे एकूण 3 टीव्ही.38 हजार 500 रुपये किमतीचा सोनी कंपनीचा एलईडी टीव्ही, 29 हजार 999 रुपये किंमतीचा एक सॅमसंग कंपनीचा एलईडी टीव्ही एक ओप्पो कंपनीचा मोबाईल हँडसेट, 1.50 लाख रुपये रोख रक्कम व 10 हजार 200 रुपये किंमतीचा व्हीसी कंपनीचा  एलईडी टीव्ही असा एकूण 3 लाख 84 हजार 699 किमतीच्या मालमत्तेचा अपहार करून नेलेला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.